वर्धा रोड मार्गिकेवरील उन्नती मार्गाचे बांधकाम पूर्ण

Date:

नागपूर : नागपूर मेट्रो च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आज दि. १२ डिसेंबर १८ बुधवार रोजी खोवला गेला. प्रथम टप्प्यातल्या रिच-१ मध्ये सुरु असलेल्या उन्नती मार्गाच्या शेवटच्या सेगमेंटचे लॉन्चिंग आज करण्यात आले. वर्धा मार्गावरील डबल डेकर पुलावर जयप्रकाश नगर मेट्रोस्टेशन जवळ हे शेवटचे सेगमेंट बसवण्यात आले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक मा. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते लौंचिंगचा सोहळा पार पडला. यावेळी महामेट्रो नागपूरचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आश्यापद्धतीने रिच-१ च्या उन्नती मार्गाचे कार्य आज संपुष्टात आले असून आता पुढील कार्यास सुरुवात होईल.

अधिक वाचा : महापौर आपल्या दारी : लकडगंज मधील झोन समस्या जाणून घेतल्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related