नागपुर : महापालिकेच्या आसीनगर झोनमधील प्रभाग ९ मधील लष्करीबाग समता मैदान, प्रभाग ६ मधील आझादनगर टेका, गांधीबाग झोनमधील प्रभाग १२ मधील चिंचघरे मोहल्ला या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश सोमवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले. तर गांधीबाग झोनमधील प्रभाग १८ मधील सिरसपेठ येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्यात आले.
प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
चिचघरे मोहल्ला प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपूर्वेस -रवी गंगाराम उमरेडकर यांंचे घर
उत्तरपचिमेस – पंढरी आंबुलीकर
दक्षिण पश्चिमेस- एकनाथ मौदेकर यांचे घर
दक्षिणपूर्वेस-यादवराव खोत यांचे घर
लष्करीबाग समता मैदान प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिणपश्चिमेस – चंद्रपाल रिपेअरिंग सेंटर
उत्तरपश्चिमेस -शीतला माता मंदिर
उत्तरपूर्वेस -तक्षशिला बुद्धविहार
दक्षिणपूर्वेस-निशांत बोदेले यांचे घर
आझादनगर टेका प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस -दारुल उलूम सरकार ताजुलआलिया मदरसा
उत्तरपूर्वेस-बब्बू गॅरेज
दक्षिणपूर्वेस -नूर मोहम्मद यांचे घर
दक्षिणपश्चिमेस-चांभार नाला
सिरसपेठ कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस -सुभाष बांगर यांचे घर
दक्षिणपश्चिमेस -बुर्रेवार यांचे घर
दक्षिणपूर्वेस -पिंपळकर यांचे घर
उत्तरपूर्वेस -बावणकर यांचे घर
Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३१ रुग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू