काटोल : तरुणाला मारून समाधान झालं नाही; जिवंतपणे आग लावून केली हत्या

Date:

काटोल : दारूच्या नशेत एका तरुणाला त्याच्या मित्रांनी आधी मारहाण व त्यानंतर गळा कापल्याची घटना समोर आली आहे. त्यावरच त्यांचं समाधान झाले नाही. तर त्या तरुणाच्या अंगावर पेट्रोल व टायर टाकून जीवंत जाळल्याची खळबळजनक घटना काटोल तालुक्यातील सावळी शिवारात घडली़ पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे़. अंगद उर्फ बिट्टू अशोकराव कडूकर (28) असे मृतकाचे नाव असून आरोपी अक्षय घिचेरिया व मंगेश जिचकार व गणेश नैताम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़.

मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृत तरुण अंगद हा गावातील मित्र अमोल नागपूरे आणि वैभव हिवसे यांच्यासोबत दुपारी 3 वाजताच्या सुमारास रिधोरा येथून एमएच 04 एडब्लु 5123 क्रमांकाच्या क्वालिस गाडीने काटोल येथे जेवणा करीता गेले़. यावेळी ते मद्य प्राशन करूनच होते़. झुणका भाकर केंद्रावर ऑर्डरला वेळ असल्याने तिघेही शेजारी एका ठिकाणी बसले. तेथे त्यांनी पुन्हा मद्यप्राशन केले़. जवळच्या टेबलवर अंगदचा व वैभवचा मित्र आरोपी मंगेश जिचकार बसला होता़. त्याच्यासोबत त्यांचा मित्र आरोपी अक्षय घिचेरिया व नैताम बसला होता़. त्यामुळे सहाही जण एकाच टेबलवर मद्य प्राशनासाठी बसले़. दरम्यान वैभवला जास्त झाल्याने जिचकार यांने वैभवला घरी रिधोरा येथे सोडून देऊ असे म्हटले़.

अमोलला झुणका भाकर केंद्रावरच सोडून अंगद, वैभव, अक्षय, मंगेश व नैताम रिधोऱ्याकडे निघाले़. मात्र, ते काटोल बसस्थानकापर्यत पोहचले असता त्यांनी वैभवला बसस्थानक परिसरात सोडून अंगदला डोगरगाव परिसरात घेऊन गेले़. आणि तेथे त्यांच्यांत वाद झाला़. त्यानंतर आरोपींनी अंगदला मारहाण केली व सावळी परब शिवारात नेऊन रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...

President Of India Inaugurates National Arogya Fair 2026 At Shegaon

Ayush Systems Of Medicine Have Made An Invaluable Contribution...