जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय) उमेशबाबू चौबे यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा पालक हरपला ! – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

Date:

मुंबई, दि.९ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांच्या निधनाने नागपूरच्या सामाजिक क्षेत्रातील एक समर्पित आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आयुष्याचा मोठा कालखंड विविध चळवळी आणि स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या उमेशबाबूंनी नागपूरच्या सामाजिक क्षेत्राचे पालकत्व खऱ्या अर्थाने निभावले. नागपूर शहरातील वंचित उपेक्षित आणि शोषित घटकांशी त्यांची नाळ आयुष्यभरासाठी जोडलेली राहिली. महापालिकेच्या माध्यमातून नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. त्यासोबतच पत्रकारिता, नाटय आणि साहित्यविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा कृतीशील सहभाग मोलाचा होता.

अधिक वाचा : नागपूर : मराठा महिला आंदोलकांनी घातला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related