जिओ चा नवीन फोन मिळणार १०९५ रुपयांमध्ये

Date:

नवी दिल्ली : ग्राहकांना ५०१ रुपयांमध्ये जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन रिलायन्स जिओ च्या मान्सून ऑफरनुसार मिळणार असल्याची चर्चा होती. पण हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना आता त्यासाठी १,०९५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ग्राहकांना या फोनसोबत सहा महिन्यांसाठी ५९४ रुपयांचा रिचार्जदेखील करावा लागणार असल्याचे कंपनीच्या नियम आणि अटींमध्ये म्हटले आहे.

दरम्यान फोनच्या बदल्यात घेतले गेलेले ५०१ रुपये ३ वर्षांनतर ग्राहकांना परत दिले जाणार आहेत. मान्सून ऑफर नुसार हा फोन ५०१ रुपयांत मिळेल आणि १०० टक्के ही रक्कम परत मिळेल असेही कंपनीच्या एका नोटमध्ये म्हटले आहे. जिओ फोन यानुसार फ्री होऊन जातो. ही रक्कम नियम आणि अटींनुसार परत केली जाणार आहे.

फिचर्स :

ड्युअल सिम
२.४ इंच QVGA डिस्‍प्ले
Kai ऑपरेटिंग सिस्‍टिम
५१२ MB रॅम
४GB इंटरनल स्‍टोरेज, 128GB पर्यंत वाढणार
२००० mAHबॅटरी
२ मेगापिक्‍सल रेयर कॅमरा आणि VGA फ्रंट फेसिंग कॅमरा
FM, ब्‍लूटूथ, GPS, Wi-Fi, NFC सपोर्ट
फेसबुक, यूट्यूब, व्‍हाट्सअॅप

हेही वाचा : Xiaomi Redmi Note 5 Pro Flash Sale Today in India via Flipkart

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related