JEE Main Exam 2021 : जेईई मेन परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु…

Date:

JEE Main Exam 2021 नवी दिल्ली: जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करु शकतात. (JEE Main Exam 2021 registration for session 4 begins today at jee main nta nic in )

परीक्षा कधीपासून
जेईई मेन परीक्षा 2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीनं याबाबात नोटिफिकेशन जारी केलं आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत. एप्रिल आणि मे सत्रातील अर्ज केलेले सत्र, प्रवर्ग आणि विषय इत्यादी माहिती अद्यावत करावी लागणार आहे.

जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?
जेईई मेन परीक्षा 2021 सेशन 4 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील स्टेपचा वापर करणं आवश्यक आहे.

स्टेप 1 नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या जेईई मेन परीक्षा वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2 जेईई मेन परीक्षा 2021 या दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्टेप 3 नवीन होम पेज ओपन होईल त्यावर विद्यार्थी ईमेल आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करु शकतात

स्टेप 4 लॉगीन डिटेल्स मिळाल्यानंतर विद्यार्थी अर्जातील सर्व माहिती भरुन परीक्षा शुल्क जमा करु शकतात

स्टेप 5 अर्ज भरल्यानंतर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट काढून सोबत ठेवा

मातृभाषेत परीक्षा
नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर
नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA) कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. त्यानंतर जेईई मेन परीक्षा मे सत्राची परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली होती. देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांनी जेईईच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Tested in India, Made for India – OPPO F29 Series, the Durable Champion Launched in India

Built for India’s workforce, the OPPO F29 is...

Cloud Migration With Amazon Web Services: AWS Migration Services

Cloud migration refers to the process of relocating digital...

AWS Server Migration Service – Uses and Benefits

What is AWS Server Migration Service (SMS)? AWS server migration...

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...