राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन

Date:

नवी दिल्ली : जैन मुनी तरुण सागर यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या २० दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरुण सागर कावीळीने आजारी होते. त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. आज दुपारी ३ वाजता दिल्ली-मेरठ महामार्गावरील तरुणसागरम तीर्थ येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

आपल्या कडव्या आणि स्पष्ट विचारांसाठी तरुण सागर ओळखले जात. त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या देखील देशभरात होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतात लाखो अनुयायांनी प्रार्थना सुरु केली होती.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तरुण सागर यांनीच उपचार थांबवून संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. जैन धर्मानुसार संथारा म्हणजे अन्न-पाण्याचा त्याग करत मृत्यूच्या समीप जाणे होय.

मुनी तरुण सागर यांचे नाव पवन कुमार जैन आहे. त्याचा जन्म २६ जून १९६७ रोजी दमोह (मध्य प्रदेश) येथील गुहजी गावात झाला. त्यांनी 8 मार्ज १९८१ रोजी गृहत्याग केला होता. त्यानंतर छत्तीसगडमध्ये त्यांनी दीक्षा घेतली होती. तरुण सागर यांच्या कडवे प्रवचनामुळे अनुयाई वर्ग मोठा होता. या प्रवचनातून त्यांनी समाज आणि राष्ट्रहीत या विषयांवर कडक शब्दात मत व्यक्त केले होते.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related