अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली. जॅकलीनची ‘यू ओनली लिव वन्स’ (YOLO) ही फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे.
‘रोटी बँक फाउंडेशन’सोबत मिळून एकत्रपणे काम करता यावे या उद्देशाने नुकतीच तिने ‘रोटी बँक फाउंडेशन’च्या स्वयंपाकघराला भेट दिली. रोटी बँक टीम आणि आपली YOLO टीमसोबत जॅकलीनने त्या ठिकाणी जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत सहयोग दिला आणि त्या माध्यमातून गरजूंना अन्न वाटप देखील केले.
वाचा महाराष्ट्राच्या मदतीला धावली लता मंगेशकर मुख्यमंत्री म्हणाले, “धन्यवाद!”
आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत जॅकलीन मुंबई पुलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेणार आहे.