IPL ;2021 धोनीचा जड्डूला दिलेला मंत्र ठरला खरा क्रिकेट जगतात यशस्वी कर्णधार म्हटलं की नजरेसमोर उभा राहतो तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी. त्याच्या चपलख खेळीचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. धोनी सामन्यादरम्यान आपल्या सहकाऱ्यांना अनेक सूचना देत असतो आणि हे बऱ्याचवेळा स्टंपिंग माईकमध्ये कैददेखील झाल्या आहेत. सोमवारी राजस्थान रॉयल्स बरोबर झालेल्या सामन्यातदेखील तसेच काहीसे घडले. राजस्थान रॉयल्स विरूद्ध झालेल्या सामन्यातदेखील धोनीची चालबाजी पाहायला मिळाली. सध्या त्याच्या या चालबाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
IPL 2021 मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसकेने फलंदाजी करत राजस्थान रॉयल्ससमोर १८८ धावांचे आवाहन ठेवले. बटलरच्या मदतीने राजस्थान रॉयल्सने धावांवर आपली पकड मजबूत केली. दरम्यान, १० षटकांतील रविंद्र जडेजाच्या पाचव्या चेंडूवर मिड-विकेटवर बटलरने षटकार ठोकला. पण हा चेंडू नो बॉल होता. यानंतर चेंडू बदलण्यात आला. चेंडू बदलल्यानंतर धोनीने नेहमीप्रमाणे सूचना दिली. ‘सूखा बॉल है, घूमेगा’ अशी सूचना धोनीने जडेजा दिली.
जडेजाने दोन षटकांत २२ धावा दिल्या होत्या. बटलरला जडेजाची गोलंदाजी लक्षात आली होती. असे वाटत होते की, धोनी दुसऱ्यावेळीदेखील ब्राव्होबरोबर मध्यमगती गोलंदाजाला देईल. पण चेंडू कोरडा होता आणि तो फिरकीपटूला मदत करू शकतो हे धोनीला समजले. धोनीने १२ वे षटक जडेजाला दिले आणि ‘सूखा बॉल है, घूमेगा’ अशी सूचना दिली.
त्यानंतर जडेजाने १२ व्या षटकांत जोस बटलर आणि शिवम दुबे हे दोन सेट झालेले फलंदाज पाठोपाठ बाद करत सामना फिरवला. त्याला मोईन अलीने ३ विकेट घेत चांगली साथ दिली. तर सॅम करनने राजस्थानला सुरुवातीला दोन धक्के दिले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक ३३ धावा केल्या तर अखेरच्या षटकांत ब्राव्होने ८ चेंडूत २० धावांची आक्रमक खेळी करत संघाला १८८ धावांपर्यंत पोहोचवले IPL 2021.