IPL 2021 : आयपीएलला धक्का, इंग्लंडनंतर आता आणखी एका देशाचे खेळाडू खेळणार नाहीत

Date:

आयपीएल 2021 (IPL 2021) चे उरलेले 31 सामने आता युएईमध्ये (UAE) होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये स्पर्धेला सुरुवात होईल, असा निर्णय शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीत करण्यात आला, पण त्यानंतर आता बीसीसीआयला आणखी एक धक्का बसला आहे.

मुंबई, 31 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) चे उरलेले 31 सामने आता युएईमध्ये (UAE) होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये स्पर्धेला सुरुवात होईल, असा निर्णय शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीत करण्यात आला. 17 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयपीएल खेळवली जाईल, अशी शक्यता आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळी आयपीएलचे 29 सामने झाले होते.

एकीकडे बीसीसीआयने आयपीएलचे उरलेले सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, पण परदेशी बोर्डकडून मात्र त्यांना धक्का बसला आहे. उरलेल्या आयपीएलमध्ये इंग्लंडचे खेळाडू खेळणार नाहीत, असं इंग्लंड बोर्डाने (England Cricket Board) आधीच सांगितलं होतं, त्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही (Bangladesh Cricket Board) आपले खेळाडू आयपीएल खेळणार नसल्याचं सांगितलं आहे.

‘शाकीब अल हसन आणि मुस्तफिजूर रहमान याला आता आयपीएल खेळण्यासाठी एनओसी मिळणार नाही, कारण आता पुढच्या मॅच आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत,’ असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमूल हसन म्हणाले. शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) आयपीएलमध्ये केकेआरकडून (KKR) खेळतो, तर मुस्तफिजूर (Mustafizur Rahaman) राजस्थानच्या टीममध्ये आहे. बांगलादेशच्या टीमचं पुढचं वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बांगलादेशच्या दौऱ्यावर येणार आहेत, यानंतर न्यूझीलंडची टीमही तिकडे जाणार आहे. हे वेळापत्रक आयपीएलसोबतच आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर ऍशले जाईल्स यांनी काहीच दिवसांपूर्वी इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी जाणार नाहीत, कारण टी-20 वर्ल्ड कप आणि ऍशेससाठी त्यांना फॉर्ममध्ये यायाचं आहे, असं जाईल्स यांनी सांगितलं.

विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेचा प्रश्न असला, तरी आयपीएलचं वेळापत्रक बदललं जाणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. परदेशी खेळाडू उपलब्ध व्हावेत, म्हणून बीसीसीआय वेगेवेगळ्या बोर्डांशी चर्चा करणार आहे.

आम्ही परदेशी खेळाडूंच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. आमचं पूर्ण लक्ष आयपीएलचा हा मोसम पूर्ण करणं आहे. स्पर्धा अर्ध्यातच सोडून देता येणार नाही, त्यामुळे जे खेळाडू उपलब्ध आहेत, त्यामध्येच स्पर्धा खेळवावी लागेल. परदेशी खेळाडू उपलब्ध झाले नाहीत, तरी काही फरक पडणार नाही. त्यांच्याशिवायही आयपीएलचं आयोजन करण्यात येईल, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले.

ऑस्ट्रेलियाची टीम बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होऊ शकते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधी ही सीरिज महत्त्वाची मानली जात आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाची टीम वेस्ट इंडिजचा दौराही करणार आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात एक टेस्ट आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ऍशेस सीरिज होणार आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार का नाही, याबाबत साशंकता आहे.

दुसरीकडे कॅरेबियन प्रिमीयर लीग 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबरमध्ये खेळवली जाईल, पण बीसीसीआय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला सीपीएलचं 10 दिवस आधी आयोजन करण्याची विनंती करणार आहे, ज्यामुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतील. कायरन पोलार्ड (Kieron Pollard), क्रिस गेल (Chris Gayle), सुनिल नारायण (Sunil Narine), ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo) हे महत्त्वाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. जर सीपीएल आधी खेळवण्यात आली नाही, तर हे खेळाडूही आयपीएलचे सुरुवातीचे सामने मुकतील.

आयपीएलचा यंदाचा मोसम खेळवला गेला नाही तर बोर्डाला 2,500 कोटी रुपयांचं नुकसान होईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आधीच सांगितलं होतं. मागच्यावर्षी पासून कोरोना व्हायरसमुळे रणजी ट्रॉफीचा मोसमही झालेला नाही. तसंच बीसीसीआयला 700 खेळाडूंना 50 कोटी रुपये द्यायचे आहेत. आयपीएलचं आयोजन करण्यात आलं, तर या खेळाडूंना पैसे देण्यात बीसीसीआयला कोणतीच अडचण येणार नाही.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...

Dominate the Digital Space: Unveiling the Top Facebook Ads Agency in India

Are you a business owner in India looking to...