ट्रायच्या निर्णयाने भारतातून आयफोन हद्दपार होऊ शकतो

Date:

ट्रायच्या निर्णयाने भारतातून आयफोन हद्दपार :

जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अ‍ॅपल आणि ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) यांच्यात डीएनडी अ‍ॅपवरून सध्या वाद सुरू आहे. स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अ‍ॅपलने डीएनडी अ‍ॅप इन्स्टॉल करावे, अशी मागणी ट्रायने केली आहे.

मात्र, अ‍ॅपल युजर्सच्या गोपनीयतेसाठी अ‍ॅपलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. अ‍ॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अ‍ॅपला जागा दिली नाही, तर कंपनीला भारतीय बाजारपेठेपासून दूर राहावे लागेल, अशी घोषणा ट्रायने केली आहे.

ट्रायने १९ जुलैपासून नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, सर्व मोबाईल फोनमध्ये डीएनडी अ‍ॅप इन्स्टॉल असावे, यामुळे फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेज रिपोर्ट करण्याची परवानगी युजरला मिळू शकेल. ट्रायने नियमांचे पालन करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सहा महिन्यांची मुदतही दिली आहे.

ट्रायने २०१७ मध्ये फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. हे अ‍ॅप सध्या अ‍ॅन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र, अ‍ॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अ‍ॅपला जागा दिली नाही.

त्यामुळे या निर्णयाने भारतातून ‘आयफोन’ हद्दपार होऊ शकतो? अ‍ॅपलने कधीही थर्ड पार्टी अ‍ॅप्सना आपल्या युजरचे कॉल आणि मेसेज वाचण्याची परवानगी दिलेली नाही. अ‍ॅपलचे म्हणणे आहे की, डीएनडी अ‍ॅप युजर्सचे कॉल आणि मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतो. त्यामुळे युजरची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. आता डीएनडी अ‍ॅपच्या या भांडणात कोण नमते घेईल, हे पाहावे लागेल.

अधिक वाचा : WhatsApp चे नवीन फिचर-ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येईल

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related