जगभरातील गुन्हेगारांना शोधणारे इंटरपोलचे प्रमुख बेपत्ता

जगभरातील गुन्हेगारांना शोधणारे इंटरपोलचे प्रमुख बेपत्ता, फ्रान्सवरून चीनला जात होते

जगभरात कुठेही कानाकोपऱ्यात लपून बसणाऱ्या गुन्हेगारांचा माग काढणाऱ्या इंटरनॅशनल पोलीस संस्था इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे फ्रांस मधून चीनला जात असताना बेपत्ता झाले असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले आहे. मेंग यांना २९ सप्टेंबरला शेवटचे फ्रांसच्या लियोन येथे पहिले गेले होते. लियोन येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे. गेला आठवडा फ्रांस पोलीस त्यांच्या तपास करत असून अजून कोणताही धागा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

मेंग यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार मेंग हरविल्यापासून त्यांनी कोणताही संपर्क घरी साधलेला नाही. फ्रांस पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मेंग चीन ला पोहोचले आहेत मात्र तेथून ते कुठे गेले हे सांगता येणार नाही. चीन मध्ये अनेक महत्वाच्या जबाबदार पदांवर मेंग यांनी यापूर्वी काम केले आहे. त्यांची इंटरपोल प्रमुखपदी २०१६ मध्ये नेमणूक झाली तेव्हा आणिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. मेंग याच्या माध्यमातून चीन सरकार इंटरपोलचा वापर करून परदेशात लपलेल्या भ्रष्ट अधिकारी, विरोधक आणि आर्थिक गुन्हेगार यांचा शोध घेऊ शकेल अशी भीती व्यक्त केली जात होती. २०२० पर्यंत इंटरपोल प्रमुखपदाची जबाबदारी मेंग यांच्यावर दिली गेली आहे.

अधिक वाचा : Denis Mukwege and Nadia Murad win 2018 Nobel Peace Prize