भारतातील सर्वांत स्वस्त 5 जी फोन ‘रिअलमी 8’ नव्या रुपात दाखल

Date:

रिअलमी (Realme) या भारतीय मोबाइल हँडसेट (Mobile Handset) उत्पादक कंपनीनं आपला रिअलमी 8 (Realme 8) हा 5 जी स्मार्टफोनची (FiveG Smartphone) नवी आवृत्ती भारतात दाखल केली आहे. रिअलमी 8 हा कंपनीचा सर्वांत स्वस्त 5 जी स्मार्टफोन असून, एप्रिलमध्ये कंपनीनं 4 जीबी आणि 128 जीबी स्टोअरेज आणि 8 जीबी आणि 128 जीबी स्टोअरेज अशा दोन ऑप्शन्समध्ये हा फोन दाखल केला होता.

आता कंपनीनं रिअलमी 8 या स्मार्टफोनची 4 जीबी आणि 64 जीबी स्टोअरेज आवृत्ती भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. स्टोअरेज क्षमता वगळता या नवीन फोनमध्ये आधीच्या फोनपेक्षा काहीही मोठा बदल नाही. बाकी सर्व स्पेसिफिकेशन्स सारखेच असून कमी स्टोअरेज क्षमतेची आवृत्ती सादर करून कंपनीनं आणखी कमी किंमतीत 5 जी स्मार्ट फोन घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध केली आहे.

भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या रिअलमी 8च्या दोन्ही व्हर्जन पेक्षाया नव्या आवृत्तीची किंमत एक हजार रुपयांनी कमी आहे. या नवीन आवृत्तीची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. रिअलमी 8 हा 5 जी स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोअरेजच्या आवृत्तीची किंमत 14 हजार 999 रुपये, तर 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.

18 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून रिअलमीच्या वेबसाइटवरून आणि फ्लिपकार्टद्वारे (Flipcart) हा नवीन 5जी स्मार्टफोन खरेदी करता येणार असून, ग्राहकांना यावर अनेक प्रकारच्या ऑफरही मिळू शकतील, असं कंपनीनं जाहीर केलं आहे. सुरुवातीच्या विक्री दरम्यान, कंपनीनं मोबीक्विक पेमेंटवर 200 रुपयांपर्यंत 10 टक्के कॅशबॅक आणि फ्रीचार्ज पेमेंटवर 75 रुपये कॅशबॅक जाहीर केला आहे. हा फोन सुपरसोनिक ब्लॅक आणि सुपरसोनिकब्ल्यू रंगात उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स :

या 5जी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित रिअलमी यूआय 2.0 आहे. यात 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून, त्याचं रिझोल्यूशन 1080 बाय 2400 पिक्सेल आहे.डिस्प्लेचा रिफ्रेशरेट 90हर्ट्झ आणि ब्राइटनेस 600 एनआयएस आहे. डिस्प्ले लाड्रॅगॉन ट्रायल ग्लासचं संरक्षण आहे. या फोनमध्ये मीडिया टेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर असून, तो माली-जी 57 एमसीटू जीपीयूसह 8 बी रॅम आणि 128 जीबी स्टोअरेजमध्ये येतो. या फोनमध्ये 18 वॅटफास्ट-चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी आहे. यामध्ये साइड माउंट केलेला फिंगर प्रिंट सेन्सर आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असून, 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगा पिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...

Top IT Companies in Nagpur – 2025 Edition

If you're looking to explore the IT landscape of...

Graduate Voter Registration for Maharashtra Legislative Council Elections: Step-by-Step Guide

The Maharashtra Election Commission has initiated the process of...