‘२०२२ पर्यंत भारतीय अंतराळात जाईल’ -पंतप्रधान मोदी

Date:

नवी दिल्ली: ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना २०२२ पर्यंत भारतीय अंतराळात जाईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आपल्या भाषणात त्यांनी देशात राबवल्या जाणाऱ्या योजना, विकास आणि जगातली भारताची बदललेली प्रतिमा यावर प्रकाश टाकला.

२०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील. तेव्हा भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. यादृष्टीने वैज्ञानिकांनी पाऊलंही उचलली असल्याची माहिती त्यांनी दिली. इस्रोमध्ये याबद्द्ल फार वेगाने काम सुरू आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं.

‘ मला आज देशाच्या नागरिकांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. २०२२मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असेल तेव्हा देशाचा एक नागरिक, अंतराळात जाईल. त्याच्या हातात तिरंगा असेल. यासोबतच मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल’ अशा शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

आतापर्यंत रशिया, चीन आणि अमेरिका या तीनच देशांनी अंतराळात माणूस पाठवला आहे. पण आता या यादीत भारताचंही नाव जोडलं जाणार आहे. इस्रोने गेल्या काही वर्षात अनेक अंतराळ मोहिमा हाती घेतल्या. चंद्रायन नंतर अनेक उपग्रह पाठवण्यात आले,चंद्रायन२ची तयारीही पूर्ण केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे यश पाहता भारत लवकरच अंतराळात माणूसही पाठवेल यात शंका नाही.

अधिक वाचा : महागठबंधन तेल और पानी के मेल जैसा, इसमें ना तेल काम का ना पानी: पीएम

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related