श्रीलंकेमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना आता व्हिसा घ्यावा लागणार नाही. या पर्यटकांना व्हिसाच्या अटीतून वगळण्यात येणार आहे. श्रीलंकेमध्ये भारत आणि चीनसारख्या काही देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना “व्हिसा मुक्त प्रवेश” देण्याला मंजूरी दिली जाईल, असे श्रीलंकेचे पर्यटनमंत्री जॉन अमरतुंगा यांनी सांगितले.
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी या संदर्भात एक कृतीदलाची स्थापना केली आहे. पर्यटनस्नेही काही देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना “व्हिसा फ्री एन्ट्री’ देण्याची शक्यता कृतीदलाकडून तपासली जाणार आहे. या कृतीदलाच्या शिफारसींच्या आधारे केलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी ऑक्टोबर – नोव्हेंबर पासून मार्च-एप्रिल दरम्यानच्या पर्यटन हंगामासाठी केली जाणार आहे.
भारत आणि चीन व्यतिरिक्त युरोप आणि पश्चिम आशियातील अन्य काही देशांना या निर्णयाचा फायदा होईल. सिंगापूर, मालदिव आणि सेशेल्स या देशातील पर्यटकांनाही व्हिसामुक्त प्रवेश दिला जाईल असेही अमरतुंगा यांनी सांगितले.
अधिक वाचा : फॉर्च्युन च्या यादीत ७ भारतीय कंपन्यांना स्थान!