नवी दिल्ली: भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्ध जहाजांवरून पाणबुडी विरोधी गोळीबार करण्यास सक्षम प्रगत टॉरपेडो डेकॉय प्रणाली मारीचला एका करारांतर्गत समाविष्ट करत नौदलाच्या पाणबुडी-विरोधी युद्ध क्षमतेला आज मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.ही अँटी- टॉरपेडो डेकॉय सिस्टम स्वदेशी डीआरडीओ प्रयोगशाळांमध्ये (एनएसटीएल आणि एनपीओएल) तयार आणि विकसित केली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम असून या डेकोय प्रणालीचे उत्पादन हाती घेईल.या प्रणालीची चाचणी घेण्यात आली असून त्याने सर्व मूल्यांकन निकष यशस्वीरित्या पूर्ण केले. आणि नौदलाच्या आवश्यक पात्रतेनुसार त्याची वैशिष्ट्ये सिध्द केली आहेत.
नौदलाच्या ताफ्यात टॉरपेडो डेकोय प्रणालीचा समावेश संरक्षण तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासासाठी भारतीय नौदल आणि डीआरडीओचा संयुक्त संकल्प असून सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रम आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये ‘आत्मनिर्भर’ महत्वपूर्ण आहे .