लडाख, 18 जून : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लडाखमध्ये सीमारेषेवर हालचालींना वेळ आला आहे.
सैन्यदलातील अधिकारी आणि जवानांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनआधी जे जवान आपल्या घरी गेले होते त्यांना पुन्हा बोलवून घेण्यात आलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या बैठकांमधून चीनला अद्दल घडवण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
हिंसक संघर्षानंतर देमचोक आणि पॅगाॉन्ग लेक जवळी सर्व गावं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. चीनजवळ 3400 किमी दूरपर्यंत नियंत्रण रेषेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर चीनकडून कोणतीही कारवाई झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारत-चीन सीमेवर असलेल्या तणावाच्या प्रश्नाबद्दल दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झाली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे वांग यी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याचं समजतं. मंगळवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात सीमेजवळ दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला. यामध्ये दोन्ही बाजूंचं नुकसान झाल्याची भारताने माहिती दिली आहे. चीनने याबाबत अजूनही अधिकृत भूमिका किंवा किती सैनिक मारले गेले याविषयी माहिती दिलेली नाही.
Also Read- China opens another front, steps up cyberattacks that target India: Intel