Independence Day 2018: स्वातंत्र्य दिवसानिमित्त Google ने Doodle करून नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Date:

मुंबई : भारत आज आपला 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपूर्ण देशात स्वतंत्रता दिनाचा उत्साह आहे. अशात गुगलने डुडलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या डुडलमध्ये भारतातील अनेक प्रतिष्ठित रंगांचे पान आणि शक्तिशाली असलेल्या जनावारांचे फोटो दाखवले आहेत. 15 ऑगस्टला संपूर्ण भारत देश एक आनंद साजरा करत आहे. भारतातील ट्रकांच्या सजावटींच्या प्रेरणेतून या डुडलच्या माध्यमातून स्वातंत्रय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुगलने या डुडलमध्ये दोन मोर, बंगाल टायगर आणि आशियातील हत्तींसोबत रंगीत फूल आणि उगवता सूर्य दाखवला आहे. चार मिलियन वर्ग किलोमीटर असा आपल्या देशाचा परिघ आहे. इथे रस्त्यांनी जोडलेला हा देश आणि या रस्त्यांवर आपल्या घरापासून लांब असलेले ट्रक ड्रायव्हर कशी परंपरा जपतात हे दाखवण्यात आलं आहे.

देशभरात वेगवेगळ्या राज्यांत स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन केलं आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाला किल्यावरून राष्ट्रीय तिरंग्याला सलामी देत लाखो – करोडो नागरिकांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी संयुक्त राज्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाल होतं. याचा आनंद सर्वत्र साजरा केला जातो. तसेच भारत मातेच्या सुपुत्रांना ज्यांनी देशासाठी बलिदान केलं त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related