केदार जाधव आणि भुवनेश्वरकुमारच्या अचूक गोलंदाजीनंतर रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर भारत ने आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर ८ विकेटनी सहज मात केली. आता सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने येतील.
आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत दुबळ्या हाँगकाँगची सलामीची जोडी फोडण्यासाठी भारताला ३५व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली होती. हाँगकाँगच्या निझाकत-अंशुमन जोडीने १७४ धावांची सलामी दिली होती.
मात्र, यातून योग्य तो धडा घेत भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या लढतीत पाकिस्तानचा डाव ४३.१ षटकांत १६२ धावांत गुंडाळला. यानंतर भारताने २९ षटकांत २ बाद १६४ धावा करून शानदार विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने १३.१ षटकांत ८६ धावांची सलामी दिली.
रोहितने ३९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. धवन ५४ चेंडूंत ४६ धावा काढून माघारी परतला. यानंतर अम्बटी रायुडू आणि दिनेश कार्तिकने अर्धशतकी अभेद्य भागीदारी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अधिक वाचा : राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार के लिए विराट कोहली और वेटलिफ्टर चानू के नाम की सिफारिश