नागपूर : मोठ्या प्रमाणात कर चुकविल्या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने काल नागपुरातल्या धरमपेठ येथील एका बिल्डरच्या कार्यालयात छापा टाकला. या बांधकाम व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात कर चुकवला असून त्याच्याकडे बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे असल्याचे आले असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणूकांच्या धामधुमीत कारवाई झाल्याने बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.
धरमपेठेतील हार्मनी होम्स येथील पी.डी व्यास यांच्यावर प्राप्तीकर विभागाने कारवाई करीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली आहेत. व्यास हे गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात असून त्यांची बुटीबोरी येथे एक विट भट्टी असल्याची माहिती आहे. प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षात व्यास यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याचा संशय आहे. त्याचप्रमाणे व्यास यांनी त्यांच्या निवासस्थानी बेहिशेबी रक्कम व काही व्यवहारांची कागदपत्रे लपवून ठेवल्याची माहिती विभागाला मिळाली होती. यावरूनच ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक वाचा : FREE CAMP FOR VARICOSE VEINS PATIENTS from 2nd to 5th April at OCHRI