नागपूर : नागपूरला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून मोठे कलाकार यथे घडले आहेत. साडे तीन दशकांनंतर राज्याची उपराजधानी आणि सांस्कृतिक राजधानीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन साठी, आपापसातील राजकारण विसरून सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र यावे आणि संमेलन यशस्वी करा. याबाबतीत पुण्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गिरीश गांधी यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
रेशिमबाग परिसरात संमेलनाचे कार्यालय स्थापन करण्यात आले असून, उद्घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिवसेनेचे शेखर सावरबांधे, माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह नाट्यपरिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर आणि प्रफुल्ल फरकासे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील युवा आणि ज्येष्ठ नाट्य कलाकारांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. या अनौपचारीक कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल फरकासे यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे यांनी केले. संमेलनाची घोषणा होताच, परदेशातून सहा मराठी नाट्यप्रेमींनी नावनोंदणी केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आयोजनासाठीच्या विविध समित्यांची स्थापना आणि त्यासाठी सदस्यांची निवड प्रक्रीया आयोजन समितीच्या बैठकीत होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी दिली.
एकांकीका स्पर्धेची घोषणा
या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातच महापौर नंदा जिचकार यांनी एकांकीका स्पर्धेची घोषणा केली. येत्या ५ फेब्रुवारीला या स्पर्धेची नागपूर आणि विदर्भ स्तरीय स्पर्धा होणार असून, उर्वरीत महाराष्ट्रातील आणि विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांकांमध्ये स्थान पटकाविणाèया एकांकीकांना अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर, १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात अंतिम फेरी आयोजिण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तिजोरीत ठणठणाट असला तरी या संमेलनाचे सहप्रायोजकत्व मनपाने स्विकारले आहे.
अधिक वाचा : गांधीबागमध्ये हायड्रोलिक कचरा टबाचे उद्घाटन