सुधारित बातमी आणि फोटो आता ‘आपली बस’ मध्ये क्षमतेएवढेच प्रवासी

परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे निर्देश : अतिरिक्त प्रवाशांवर निर्बंध

आपली बस

नागपूर, ता. १९ : नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ मध्ये बसमध्ये जेवढी आसन क्षमता आहे तेवढेच प्रवासी बसविण्यात यावेत. आसन क्षमतेपेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी बसमध्ये घेण्यात येउ नये, असे सक्त निर्देश परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिले.

गुरूवारी (ता.१९) परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मोरभवन येथील बसस्थानकाला आकस्मिक भेट दिली. यावेळी मनपाचे परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, निरीक्षक शुक्ला यांच्यासह डिम्ट्सचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी ‘आपली बस’च्या वाहक चालकांशी संवाद साधला. ‘कोरोना’च्या संरक्षणाच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात यावी. ‘कोरोना’च्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. बसमध्ये गर्दी होणार नाही याची विशेष खबरदारी घेत अतिरिक्त प्रवासी टाळावेत. आसन क्षमतेव्यतिरिक्त कोणताही प्रवाशी उभ्याने प्रवास करणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

याशिवाय वाहक व चालकांनी नियमीत मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करावा. स्वत:सह इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले.

Also Read- मनपाची सर्वसाधारण सभा पुढे ढकलली कोरोना’मुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय