देशात सध्या करोनाचा कहर कायम आहे. Covid-19 ला हरवण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टर्स, फ्रंटलाइन वर्कर आपल्या पूर्ण ताकदीने याला टक्कर देत आहेत. करोनाला हरवण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे टेस्टिंगची. सध्या टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. टेस्टिंग लवकर करणे हे खरंच आव्हानात्मक आहे. परंतु, बिहारमधील IIIT च्या विद्यार्थ्यांनी यावर यश मिळवले आहे.
जबरदस्त आहे सॉफ्टवेयर
विद्यार्थ्यांनी बनवलेले सॉफ्टवेयर जबरदस्त आहे. या सॉफ्टवेयरच्या माध्यमातून करोना आहे की नाही, हे अवघ्या दोन मिनिटात समजते. या सॉफ्टवेयरच्या मदतीने रुग्णांच्या छातीचा एक्सरे काढला जातो. त्यानंतर सिटी स्कॅन काढला जातो. हे दोन्ही रिपोर्ट पाहून अवघ्या काही सेकंदात माहिती होते की, व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. या सॉफ्टवेयरच्या माध्यमातून केवळ करोना नव्हे तर टीबी, व्हायरल आणि बॅक्टेरियल निमोनिया सह सामान्य रुग्णांचा एक्सरे प्लेट वरून सेकंदात माहिती केली जाते.
लवकरच मिळणार मान्यता
या अविष्कारला मान्यता देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ICMR ने यासाठी सल्लागार समितीची स्थापना केली आहे. पटणा एम्स मध्ये या सॉफ्टवेयरची टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. एम्स मध्ये पुढील २ ते ३ दिवसांत अनेक कोविड रुग्णांचा एक्सरे आणि सिटी स्कॅन इमेजची तपासमी कोविड डिटेक्टिंग सॉफ्टवेयर द्वारे केली जात आहे. यानंतर रुग्णांच्या आलेल्या निगेटिव्ह किंवा पॉझिटीव्ह रिपोर्टचा सल्लागार समिती स्टडी करणार आहे. यानंतर या रिपोर्टला ICMR ला पाठवले जाणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत याच्या मान्यतेसंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.