ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ झळकणार एकत्र

Date:

अभिनेता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोघेही आता एका आगामी चित्रपटातून एकत्र येणार असल्याची घोषणा चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतीच आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून केली आहे.

अद्याप यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे शीर्षक निश्चित केलेले नसून ऋतिक ‘धूम २’ या चित्रपटानंतर तब्बल १२ वर्षांने यशराज फिल्मससोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर पाहून हे दोन्ही कलाकार चित्रपटात नायकाची भूमिका साकारणार असल्याचा लोकांचा समज झाला असेल, असे आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे ऋतिकने म्हटले आहे.

प्रेक्षकांना ऋतिकचे हे ट्वीट गोंधळात टाकणारे आहे. या दोघांतील एक कलाकार या ट्वीटवरून चित्रपटात निगेटीव्ह भूमिका साकारणार असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. भारत, इटली, पोर्तुगाल, स्वीडन अशा अनेक ठिकाणी या चित्रपटाची शूटींग केली जाणार आहे. चित्रपट २०१९ मध्ये २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : युगपुरुष अटल : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या आयुष्‍यावर बायोपिक

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related