व्हॉटस्ॲप, फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन आणि यू-ट्यूबवर सगळ्यांचेच अकाऊंट असतात. युजर्स दिवसरात्र यावर व्हिडिओ, पोस्ट पहात असतात, इतरांना शेअर करण्याचा आनंद लुटत असतात. मग कोट्यवधी युजर्सना ही सेवा फुकटात देणे कंपन्यांना परवडते कसे, अशा प्रश्न पडू शकतो. जाणून घेऊ फुकटात दिसणारे हे मायाजाल चालवणाऱ्यांची तिजोरी भरते तरी कशी?
बिझनेस सब्सक्रिप्शन
हे अकाऊंट उघडणाऱ्या उद्योगपतींना एकगठ्ठा (बल्क) एसएमएस तसेच ऑटो एसएमएस अशा सुविधा मिळतात. यासाठी युजरला चार्जेस भरावे लागतात.
डायरेक्ट व्हॉटस्ॲप कनेक्ट
ऑनलाईन विक्रीसाठी असलेल्या उत्पादनांवर हा ऑप्शन दिला जातो. इथे क्लिक करताच कंपनीशी व्हॉटस्ॲपवर सहजपणे संपर्क प्रस्थापित करता येतो. ही सेवा सशुल्क असते.
जगात व्हॉटसॲप युजर्स – २०० कोटी, भारतात ४० कोटी
कमाई – ३७ हजार कोटी
——-
फेसबुक कमावते कसे?
फेसबुकची वेबसाईट आणि ॲपवर जाहिराती देता येतात. त्यातून कंपनीला ९८ टक्के महसूल मिळतो. ४५ टक्के कमाई अमेरिका, कॅनडामधून तर ५५ टक्के उर्वरित देशांमधून होते. भारतातून कंपनीने ९ हजार कोटी कमावले आहेत.
फेसबुक युजर्स २८० कोटी जगात, ३४ कोटी भारतात
कमाई – ६.३८ लाख कोटी
—-
ट्विटरला कसा मिळतो पैसा?
जाहिरातींतून कंपनीला ८६ टक्के महसूल मिळतो. डेटा लायसन्सिंग व अन्य मार्गाने १४ टक्के महसूल मिळतो.
– ट्विटरवर उत्पादने, ट्वीटस्-अकाऊंटस्-ट्रेंडस् च्या प्रमोशनसाठी जाहिराती देता येतात.
– हिस्टॉरिकल डेटा आणि रिअल टाईम डेटा पाहण्यासाठी युजरला चार्जेस भरावे लागतात.
– भारतातून कंपनीने ५६ कोटी कमावले आहेत.
– कमाई २८ हजार कोटी
– ट्विटर युजर्स ३५.३ कोटी जगात; २.२ कोटी भारतात
——–
तुम्ही जाहिराती बघता, कमाई यू-ट्यूबची होते
– जाहिरातींमधून यू ट्यूबला सर्वाधिक महसूल मिळतो. प्रीमियम सब्सक्रिप्शनमधून कंपनीला चांगले पैसे मिळतात.
– सुपर चॅट, चॅनेल मेंबरशिपमधून होणाऱ्या कमाईतून काही हिस्सा कंपनीला द्यावा लागतो.
– कमाई १.४६ लाख कोटी
———–
लिंक्ड इनही आपल्या अनेक सेवांच्या माध्यमांतून ५९ हजार कोटींची कमाई करते.
*२०२० च्या अहवालानुसार