डीआरडीओ संस्थेकडून कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी ‘दीपकोव्हॅन’ नावाचे कीट तयार केले आहे. आपल्या शरिरात किती टक्के कोरोना अँटीबॉडीज तयार झाल्याची माहिती मिळणार आहे. दरम्यान त्याची किंमत फक्त ७५ रुपये असणार आहे.
यामुळे कोरोना संसर्गावर लवकर मात करण्यासाठी डीआरडीओला नविन पर्याय मिळाला आहे. २ डीजी हे भारतीय बनावटीचे औषध तयार केल्यानंतर डीआरडीओने दुसरा प्रभावी मार्ग शोधला आहे. दिल्लीच्या वॅनगार्ड डायग्नॉस्टिक्सच्या मदतीने दीपकोव्हॅनची निर्मीती करण्यात आली आहे. डीपकोवनच्या मदतीने मानसाच्या शरिरात किती प्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या, प्लाझ्मा सुद्धा किती विकसित झाला हे समजणार आहे.
दीपकोव्हॅन विकसित करताना १ हजारपेक्षा जास्त लोकांवर चाचणी करण्यात आली. आयसीएमआरकडून याला एप्रिलमध्येच परवानगी देण्यात आली होती. डीसीजीआयकडूनही याला मे महिन्यात मान्यता देण्यात आली. सुत्रांच्या माहितीनुसार जुनच्या पहिल्या आठवड्यात याला बाजारात मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
दीपकोव्हॅन स्पाइक आणि न्यूक्लोकॅप्सीड प्रोटीन शोधण्यास मदत करू शकतो, याची उच्च संवेदनशीलता ९७% आहे. आणि विशिष्टता 99% आहे. या किटची तपासणी १ हजार हून अधिक रुग्णांवर केली जाईल. कोरोना विरूद्धच्या महामारीत हे महत्त्वपूर्ण मानले जाते. लसीकरणाच्या वेळी या माहितीच्या सहाय्याने आवश्यक ती पावले उचलण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी, डीआरडीओकडून कोरोना विरोधी २-डीजी हे औषध १७ मे रोजी बाजारात आले आहे. २-डीजी औषधामुळे कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज कमी भासणार आहे. कोरोनाच्या मध्यम व गंभीर रूग्णांवर २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (२-डीजी) औषधाच्या आपत्कालीन वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मान्यता दिली. ८ मे रोजी, संरक्षण मंत्रालयाकडून की २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (२-डीजी) च्या क्लिनिकल चाचण्यांमधून रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांचे कृत्रीम ऑक्सिजन कमी करण्यास मदत करते. तसेच, रुग्ण या औषधाने वेगाने बरे होण्यास मदत होते.