नागपूर : कोणताही व्यवसाय करताना नव नवीन युक्ती शोधावी लागते. आता नागपुरात एक भारी हॉटेल सुरु झाले आहे. मात्र, येथे ग्राहकांची ऑर्डर घ्यायला येणाऱ्यासोबत सेल्फी घेतल्यानंतर मागविलेल्या ऑर्डरवर ग्राहक ताव मारताना दिसत आहे. कारण या हॉटेलमध्ये आल्यावर एक मस्त सरप्राईज मिळत आहे. काय आहे, ते सरप्राईज?
हॉटेल २.० मध्ये रोबो ब्युटी रेड दिसतो. तसेच रोबो ब्युटी ग्रे आणि रोबो ब्युटी यल्लो अशा तीन प्रकारचे रोबो पाहायला मिळतात. तुम्ही म्हणाल, हे रोबो कशाला. त्याचीही गंमत आहे. ते चक्क ग्राहकांची ऑर्डर घेतात आणि ते ऑर्डर टेबलापर्यंत आणूनही देतात. भारी आहे ना!
नागपूर च्या हॉटेलमध्ये हे तीन नवे पाहुणे शहरात चर्चेचा विषय झाला आहे. नागपूर मधल्या हॉटेल रोबो २.० म्ध्ये हे तिघेही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत. सध्या या हॉटेलमधील हे ग्राहकांची ऑर्डर घेतात आणि त्यांच्यापर्यंत खाद्यपदार्थ आणूनही पोहोचवतात. त्यापुढचे काम म्हणजेच पदार्थ ताटात वाढण्याचे काम मात्र माणूसच करतो. ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरची कमांड हॉटेलचे व्यवस्थापक टॅबमार्फत रोबोंना देतात.
नागपूर च्या इटर्निटी मॉलमध्ये हे “रोबो टू पॉईंट झिरो” हॉटेल आहे. हे रोबो खाद्यपदार्थ टेबलजवळ घेऊन आले की ग्राहक खायच्याआधी त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यात मग्न होताना दिसत आहे. या रोबो वेटर्समुळे सध्या या हॉटेलचा व्यवसाय जोरात आहे आणि रोबोंकडून पदार्थ ऑर्डर देणे आणि त्यांनी घेऊन येणे हा अनुभवही एकदम भन्नाट आहे, असे येथे आलेले ग्राहक सांगतात.