शीर कापून कुख्यात गुंडाची हत्या : अर्धा किमी वर मिळाले शीर

Date:

नागपुर : खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चणकापूरमध्ये एका कुख्यात गुंडाची मंदिराच्या आवारात हत्या करण्यात आली. चणकापूरमधील प्रसिद्ध हनुमान आणि शनी मंदिराच्या आवारात आज पहाटे ही घटना घडल्याने खळबळ उडाली. कुख्यात गुंड अशोक उर्फ गधा पासवानला परिसरातील इतर ३ गुन्हेगारांनी निघृणपणे ह्त्या करण्यात आली. आरोपींनी हत्येनंतर त्यांचे शीर छाटून घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दुसऱ्या मंदिराजवळ फेकून दिले.

माहिती नुसार चणकापूर येथील हनुमान आणि शनी मंदिराच्या आवारात हनुमान मंदिराच्या मागे किचन शेड (स्वयंपाकाचे शेड) आहे. आज पहाटे परिसरातील लोकांनी किचनशेडला लागून कुख्यात गुंड अशोक पासवानचे धड रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. मात्र, या मृतदेहाचे शीर त्या ठिकाणी नव्हते. कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या शीराचा शोध सुरु केला. घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर लांब नाग मंदिराजवळ त्याचे शीर आढळून आले.

अशोक पासवान रात्री गावातील एका ठिकाणी नामकरणाच्या कार्यक्रमात गेला होता. त्याच कार्यक्रमात खापरखेडा परिसरातील रोहित सूर्यवंशी, आशिष वर्मा आणि सुरज वरणकर हे गुंडही आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हे तीघे अशोक पासवानसोबतच बाहेर निघाले होते. त्यामुळे रात्री या सर्व गुन्हेगारांमध्ये काही कारणाने भांडण होऊन अशोक पासवानची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा : अंबाझरीतील ऑनलाइन सेक्‍स रॅकेट वर छापा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related