आशियाई क्रीडा स्पर्धांतील ऍथलेटिक्स प्रकारातील 400 मीटर शर्यतीत हिंदुस्थानच्या हिमा दास ने महिला गटात, तर मोहम्मद अनासने पुरुष गटात रौप्यपदकाची कमाई करून स्पर्धेचा आठवा दिवस गाजविला. धावपटू हिमा दास ने 50.79 सेकंद वेळेसह नव्या राष्ट्रीय विक्रमासह 400 मीटर शर्यतीत रूपेरी यश संपादन केले. बहरीनच्या सल्वा नासिरने 50.09 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. कझाकिस्तानच्या एलिना मिखिना हिने 52.63 सेकंद वेळेसह कांस्यपदकाला गवसणी घातली.
या शर्यतीत हिंदुस्थानची आणखी एक धावपटू निर्मल हिला 52.96 सेकंद वेळेसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नुकत्याच झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक सुकर्णपदक जिंकणाऱया 18 कर्षीय हिमा दास ची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती पुरुष गटात मोहम्मद अनासने 45.69 सेकंदांची केळ नोंदवीत हिंदुस्थानला रौप्यपदक मिळवून दिले. कतारच्या अब्दालेह हसनने 44.89 सेकंद वेळेसह सुवर्ण, तर बहरीनच्या अली खामिसने 45.70 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. हिंदुस्थानचा आणखी एक धावपटू राजीव 45.84 सेकंद वेळेसह चौथ्या स्थानी राहिला.
दुती चंदची विक्रमी धावेसह रौप्यकमाई
हिंदुस्थानच्या दुती चंदने महिलांच्या 100 मीटर्स दौडीत 11.32 सेकंद ह विक्रमी वेळ नोंदवत हिंदुस्थानसाठी आज आणखी एका रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक पटकावणाऱया बहरीनच्या इडिओंग ओडियोंगने 11.30 सेकंद ही वेळ नोंदवली. दुतीला पहिले स्थान मिळवण्यासाठी केवळ 0.02 सेकंदच कमी पडले. आशियाई क्रीडा स्पर्धेत एखाद्या हिंदुस्थानी महिला धावपटूने नोंदवलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेसह दुतीने आज रौप्यपदक पटकावले. यापूर्वी 1986 एशियाडमध्ये हिंदुस्थानच्या पी. टी. उषाने 11.95 सेकंद या वेळेसह 100 मीटर्स दौडीचे रौप्यपदक मिळवले होते. दुतीने त्या हिंदुस्थानी विक्रमात सुधारणा केली.
अधिक वाचा : Asian Games 2018 : Dipika Pallikal settles for bronze in squash