मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (30 एप्रिल) संध्याकाळी महाराष्ट्राच्या जनतेला सोशल मीडियाद्वारे संबोधित करणार आहेत. १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री करणार राज्याच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील लॉकडाऊन 15 वाढविण्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत नेमकं काय-काय बोलणार याकडेच आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
उद्धव ठाकरे राज्यातील लॉकडाऊन 15 वाढविण्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत नेमकं काय-काय बोलणार याकडेच आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
वाचा : Coronavirus Nagpur updates: नागपुरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
राज्यात लॉकडाऊन लागू करुन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसात दररोज ६५ हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशावेळी आता उद्धव ठाकरे संबोधनातून राज्यातील जनतेला नेमकं काय सांगणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.