नागपूर : बायफ्रेंडच्या मदतीने अल्पवयीन नातीने चिरला आजीचा गळा

Nagpur: Senior citizen found with her throat slit in MIDC

नागपूर : घरी एकट्याच राहत असलेल्या 62 वर्षीय वृद्धेची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना दोन दिवासआधी नागपूरच्या (Nagpur) एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एसआपीएफ कॅम्प पाठीमागे असलेल्या सप्तक नगरात घडली होती. या वृद्ध महिलेची हत्या तिच्याच नातीने केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

मृतक विजयाबाई पांडुरंग तिवलक या राज्य राखीव पोलीस दलात स्वयंपाकी पदावरून 2017 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सप्तक नगर येथील घरी एकट्याच राहत होत्या. त्यांना अमोल नावाचा मुलगा व दोन मुली आहे.मुलगा राज्य राखीव पोलीस दलात शिपाई असून त्याच्या पत्नीसह एसआरपीएफ वसाहती मधील क्वार्टरमध्ये वेगळा राहतो.दोन मुलीचे लग्न झाले असून त्या नागपूर शहरात राहतात. शनिवारी दुपारी एक वाजता तिच्या घरचे भांडेधुनी करणारी मोलकरीण जेव्हा आली तेव्हा तिला घरच्या बेडरूममध्ये विजया पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात दिसली. तिच्या डोक्यावर जखमा होत्या. मोलकरणीने याबाबत विजयांच्या जावई व मुलाला माहिती दिली.

त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना सुद्धा कळविण्यात आले. एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे, सहपोलीस निरीक्षक लबडे, उपनिरीक्षक जाधव घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पोलिसांनी त्या महिलेच्या मुली व मुलाला देखील बोलावून विचारपूस केली असून पुढील तपास सुरू केला. पोलिसांना हत्येचे धागेदोरे गवसत नव्हते.

तपासात मृतकच्या कुटुंबापैकी वृद्ध महिलेची ना हजर नसल्याचे पोलिसांना आढळले. कुटुंबियांकडून माहिती घेतली असता 17 वर्षीय नात ही कुटुंबासोबत राहत नाही ती अल्पवयीन मुस्लिम प्रियकरासोबत राहते असे लक्षात आले. त्यांनतर पोलिसांनी तपासाची सूत्रे तिच्यावर वळवली असता ही घटनेच्या दिवशी आजीकडे असल्याचे तांत्रिक पुराव्यातून पुढे आले. सोबतच तिचा प्रियकर व त्याचे मित्र देखील मृत महिलेच्या घरी आले असल्याचे उघड झाले.

त्यांनतर पोलिसांनी निलेश पौणिकर, कादिर खान व आरजू आलम यांना अटक केली. त्यांतून आजीच्या नातीच्या सांगण्यावर आम्ही येथे चोरी करायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आजीला जाग आल्याने त्यांनी तिचा गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले. आज नागपूर पोलिसांनी अल्पवयीन नात व तिच्या प्रियकराला अमरावती येथून अटक केली.

दोघेही घरच्यांपासून दूर राहत होते. प्रियकराला व्यवसाय टाकण्यासाठी पैसा हवा होता, आपल्या आजीकडे 15 लाख रुपये व सोने आहे असा नातीचा अंदाज होता. त्यामुळे हा पैसा मिळवण्याच्या उद्देशाने नातीने हे सर्व कृत्य केल्याचे पुढे आले. हत्येनंतर आरोपींना 2300 रुपये थोडेफार दागिने मिळाले होते तेच लुटून ते फरार झाले होते. सुरवातीला बेहोश करून लूट करण्याचा आरोपींचा उद्देश होता.मात्र मृतक आपला भांडाफोड करेल म्हणून विजया यांची हत्या करण्यात आली, अशी कबुली दोघांनी दिली.