नागपूर : गुढीपाडव्याच्या निमित्ताने बडकस चौक येथे आयोजित कार्यक्रमात महिलांनी रामनामाचा जागर केला. हिंदू रक्षा समितीद्वारे शनिवारी सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या विदर्भ प्रांत सहबौद्धिक प्रमुख डॉ. लीना गहाणे उपस्थित होत्या. व्यासपीठावर समितीचे संयोजक सुनील काबरा उपस्थित होते. २००६ साली द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी गोळवलकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रारंभ झालेल्या मातृशक्ती जागरणाच्या या अभिनव उपक्रमाचे यंदा चौदावे वर्ष होते. यावेळी बोलताना डॉ. गहाणे यांनी आरोग्य दिनाचा रामायणातील विविध दाखले देऊन प्रत्येक प्रसंगातील सीतेचा धीरोदात्तपणा विषद केला.
दीपप्रज्वलन व प्रास्ताविक झाल्यानंतर हजारो महिलांनी सामूहिक श्रीरामरक्षा पठण केले. यावेळी पंडित बच्छराज व्यास चौकातील वातावरण राममय झाले होते. कार्यक्रमाचे संचालन गौरी खिरवडकर यांनी केले. तसेच आभारही मानले.
अधिक वाचा : हिमसागर एक्सप्रेसचे नागपुरात जल्लोषात स्वागत