नागपूर : स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपूरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कार्यकारी महापौर श्री.दिपराज पार्डीकर, सभापती स्थायी समिती श्री.विरेन्द्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे, अति.आयुक्त श्री.राम जोशी, अति.आयुक्त श्री.अजीज शेख, अति.उपायुक्त श्री. राजेश मोहिते, उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने कार्यकारी महापौर श्री.दिपराज पार्डीकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
यावेळी नगरसेवक श्री.किशोर जिचकार, सहा.आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्य. अभियंता सर्वश्री. अनिरुध्द चौगंजकर, राजेश भुतकर, मनोज गणवीर, सोनाली चव्हाण, अमीन अख्तर, राजु रहाटे, अविनाश बारहाते, प्रमुख् अगनिशामक अधिकारी राजेन्द्र उचके, सहा.आयुक्त स्थानिक संस्था कर व कर आकारणी मिलींद मेश्राम, बाजार अधिक्षक श्रीकांत वैद्य, निगम अधिक्षक मदन सुभेदार, सहा. अधिक्षक मनोज कर्नीक, उपअभियंता कल्पना मेश्राम, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनविस, दिलीप तांदळे, कामगार नेते राजेश हातीबेड, राजु लोणारे, राष्ट्रीय नागपूर एम्पलाईज असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, प्रकुलचन्द्र सतदेवे, केशव कोठे, राजु दुबे, किशोर तिडके, राजु भंडारकर, विलास धुर्वे यांचेसह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा : नागपूर में शहर पुलिस के द्वारा स्कूटर रैली का आयोजन