1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा करणार बंद, स्टोरेजसाठी द्यावे लागेल पैसे

1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा करणार बंद, स्टोरेजसाठी द्यावे लागेल पैसे

गुगल (Google) 1 जूनपासून आपली विनामूल्य सेवा बंद करणार आहे. दरम्यान, गुगलकडून गुगल फोटो विनामूल्य क्वाऊड स्टोरेजची सुविधा 1 जून 2021 पासून बंद करीत आहे. म्हणजेच, आता गुगलकडून गुगल फोटो क्लॉउट स्टोरेजसाठी शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही गुगल ड्राईव्ह किंवा इतर कोणत्याही जागी आपले फोटो आणि डेटा स्टोअर करत असाल तर यासाठी शुल्क द्यावे लागेल. कंपनीकडून यापूर्वीच यासंबंधीची घोषणा केली होती.

सध्या गुगलकडून युजर्संना अमर्यादित विनामूल्य स्टोअर ऑफर करीत आहे, जेणेकरून युजर्स त्यांचे फोटो किंवा इतर डॉक्युमेंट ऑनलाइन स्टोअर करु शकतील, जे इंटरनेटद्वारे कोठेही एक्सेस करू शकतील. मात्र, 1 जून 2021 पासून युजर्संना गुगलकडून केवळ 15 जीबी विनामूल्य क्लाऊड स्टोरेजची ऑफर दिली जात आहेत. जर युजर्संना यापेक्षा अधिक फोटो किंवा डॉक्युमेंट ऑनलाईन स्टोअर करायची असतील तर त्यांना शुल्क भरावे लागेल.

किती शुल्क द्यावे लागेल
जर युजर्संना 15 जीबी पेक्षा अतिरिक्त डेटा हवा असेल तर त्यांना दरमहा 1.99 डॉलर (146 रुपये) द्यावे लागेल. कंपनीच्या वतीने यास गुगल वन (Google One) असे नाव देण्यात आले आहे. ज्याचे वार्षिक सब्सक्रिप्शन शुल्क 19.99 डॉलर (सुमारे 1464 रुपये) आहे. युजर्संना नवीन फोटो आणि व्हिडिओंच्या स्टोअरेजसाठी पैसे द्यावे लागतील. जुने फोटो पूर्वीप्रमाणेच सुरक्षितपणे स्टोअर केले जातील. गुगल पिक्सेल 2 स्मार्टफोन युजर्स विनामूल्य हाय क्लॉलिटी फोटो बॅकअप वापरण्यास सक्षम असतील. त्याचप्रमाणे गुगल पिक्सल 2,3,4,5 स्मार्टफोन युजर्स यांनाही विनामूल्य फोटो व व्हिडिओ स्टोअरेजची सुविधा उपलब्ध आहे.

आता पासवर्डशिवाय Gmail करता येणार Login,जाणून घ्या…
गुगल आपली सिक्योरिटी अधिक मजबूत करण्यासाठी नवे फीचर लॉन्च करत आहे. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकण्याची गरज पडणार नाही. तसेच इतर कोणीही तुमचा पासवर्ड आणि यूजर नेम वापरुन अकाऊंट ओपन करण्याचा प्रयत्न केला तरी ते ओपन होणार नाही. म्हणजेच येत्या काळात युजरचं अकाऊंट अधिक सेफ आणि सुरक्षित होणार आहे. गुगल टू फॅक्टर ऑथिन्टिकेशन फीचरच्या माध्यमातून सिक्योरिटी अधिक मजबूत करणार आहे. Google ने आपल्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता लोकांना गुगल साईन इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनचा प्रयोग करावा लागेल. या फीचरमुळे अकाऊंट अधिक सुरक्षित होईल. कंपनीने हे फीचर त्या अकाऊंटला डिफॉल्ट सुरू होईल, जे अकाऊंट कॉनफिगर केले गेले आहेत असं देखील म्हटलं आहे.