नागपुर : मागील काही दिवसापासून उपराजधानित वातावरण उष्ण झाले होते त्यापासून आज नागपुरकरांना दिलासा मिळाला कारण गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज सकाळपासून शहरात हजेरी लावली. दोन आठवड्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. मात्र, आता आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागपूरकर सुखावले आहेत.
आज सकाळपासून रिमझिम पाऊस होता. मात्र, दुपार होताच पावसाचा जोर वाढला आहे. शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही भागात वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाच्या लपंडवामुळे शेतकरी त्रस्त होते. मात्र, अचानक बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना थोड्या प्रमाण का होईना दिलासा मिळाला आहे. उशीरा पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. परतीच्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. मात्र, बऱ्याच भागांत सोयाबीन कापणीला आला आहे. या पावसामुळे सोयाबीन कुजण्याची व त्याला कोंब येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचे आगमन झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.