प्रेमसंबंधातून तरूणीची आत्महत्या; प्रियकराचा शोध सुरू

Date:

नागपूर : प्रियकराशी वाद झाल्यानंतर प्रेयसीने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. खुशबू मेश्राम (वय 17) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू हिचे वडील काही वर्षांपूर्वी मरण पावले. तर खुशबू लहान असतानाच आई सोडून निघून गेली होती. तेव्हापासून ती काकांकडे राहत होती. तिने शिक्षण बंद करून ब्युटी पार्लर क्‍लासेस लावले होते. तेथेच ती ब्युटीशियन म्हणून काम करीत होती. खुशबूचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास तिचे आणि प्रियकराचे कोणत्यातरी कारणावरून वाद झाला.

या वादातून दोघांत अबोला होता. त्यामुळे ती सायंकाळपासूनच तणावात होती. घरी आल्यानंतर ती जेवन न करता झोपायला गेली. सकाळी झोपेतून उठून सर्व जण खाली चहा घेत असताना खुशबूने सिलींग फॅनला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. चहा घ्यायला खाली न आल्याने काका वरती गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. खुशबूला आत्महत्येस कुणी प्रवृत्त केले का? याबाबत जरीपटका पोलिस तपास करीत आहेत.

अधिक वाचा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related