ग्वाल्हेर: ब्ल्यू व्हेल, ‘मोमो’ गेमनंतर आता ‘रुसी रुले’ गेम जीवघेणा ठरतोय. या गेममुळं 21 वर्षीय तरुणीनं स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे घडली आहे.
करिश्मा यादव असे मृत तरूणीचे नाव आहे. तर, करिश्माचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. करिश्माला ‘रुसी रुले’ या गेमचं प्रचंड वेड होते त्यातुनच करिश्माने आत्महत्या केली आहे.
मोमो आणि ब्लू व्हेलप्रमाणेच “रूसी रुले’ गेममध्ये अनेक टास्क असतात त्यातीलच एक टास्क म्हणजे बंदुकीत फक्त एक गोळी ठेवून बंदूक स्वतःच्या डोक्यावर ठेवून चालवण्याचा टास्क या गेममध्ये दिला जातो. बंदुकीचं ट्रिगर दाबल्यानंतर गोळी चालली नाही तर आपण नशीबवान ठरतो. असा हा गेम आहे.
दरम्यान, करिश्मा तिच्या मित्रांसोबत व्हॉट्सऍप वरिल व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत असतानाच ती एकीकडे ऑनलाइन रुसी रुले गेम खेळत होती. मित्रांशी गप्पा मारत असतानाच करिश्मानं तिच्याजवळ असलेली बंदूक मित्रांना दाखवली आणि बंदुकीत एक गोळी टाकून बंदुकीचं चेम्बर फिरवलं. बघुयात आज कोणाचं नशीब जोरावर आहे, असं म्हणत तिनं बंदूक चालवली आणि दुर्देवानं तिचा त्यात मृत्यू झाला.
अधिक वाचा : ‘मोमो’ गेममुळे भारतात पहिला बळी, विद्यार्थीनीची आत्महत्या