नागपुर : भूत म्हटले की माणसाच्या अंगाला शाहरे येतात आणि हेच भूत जर आपणास भर मार्गावर वावरतांना दिसले तर काय होणार ? हो विदर्भातील चंद्रपूर मध्ये एक अशी घटना पाहायला मिळाली.
चंद्रपूर शहराच्या बाह्य भागात बल्लारपूरकडे कोळसा खाणीच्या किर्र जंगलातून जाणारा एक मार्ग आहे. या जमन-जट्टी मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास चक्क भूतं येऊन रात्रपाळीच्या ड्युटीवर जाणाऱ्या लोकांना अचानक पुढे येत घाबरवू लागली. ही भूतं म्हणजे खरी भूत नसून ११ -१२ वीत शिकणारी सहा मुलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लोकांना घाबरवून त्यांचे व्हिडीओ बनवणाऱ्या मुलांना ताब्यात घेतलं. तीन तास बसवून त्यांना चांगलीच समज दिली. पोलिसांकडून आता असा ‘मंत्र’ मिळाल्यानंतर असं पुन्हा करणार नाही, म्हणत मुलांनी कानाला खडा लावला.
वाघ-बिबटे-वन्यजीवांचे भय असलेल्या एका मार्गावर ६ अल्पवयीन मुले भुताचा वेष धारण करून लोकांना घाबरवत होते आणि त्याचा व्हिडिओ देखील तयात करत होते. यूट्युबवर प्रभावित होऊन Ghost Prank बनवण्याचं त्यांनी ठरवलं. माहिती नुसार ही सहाही मुले ११ वी आणि १२ वीची विद्यार्थी आहेत. आणि गावाकडून शहरात शिक्षणासाठी आली आहेत. काही दिवसांपूर्वी या मुलांनी Ghost Prank करण्याची शक्कल लढवली.
विशेष म्हणजे या थरकापाचे चित्रीकरण मोबाईल मध्ये केले जात होते. अतिउत्साहाच्या भरात आणि चुटकीसरशी प्रसिद्ध होण्याच्या हव्यासात या मुलानी हा धोकादायक मार्ग देखील निवडला. या मुलांनी झाडांच्या आडून थेट समोर येत अनेक दुचाकीस्वारांना घाबरविले आणि या थरकापाचा आसुरी आनंद घेतला. हा दुचाकीस्वार भीतीने अपघातग्रस्त होईल, एखाद्याचा जीव जाईल याची देखील तमा या अल्पवयीन मुलांनी बाळगली नाही. हा प्रकार सुरू राहिल्यावर कुणीतरी शहर पोलिसांना याची माहिती दिली. यातील गांभीर्य पाहून अधिक कुमक पाठविण्यात आली. पोलिसांनी सावध पवित्रा घेत घटनास्थळ गाठले आणि अल्पवयीन भूतांना थेट ठाण्यात नेले आणि ठाण्यात या भूतांना तब्बल ३ तास योग्य समज देण्यात आली.
अधिक वाचा : शहर के वकील चंद्रशेखर शर्मा पर कातिलाना हमला