नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाला जर्मनीचे सहकार्य

Date:

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना आता जर्मनीतील कार्ल्सरु शहराचे सहकार्य मिळणार आहे. यासंबंधी कार्ल्सरु व नागपूर महापालिका यांच्यात जर्मनीमध्ये एका करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या नेतृत्वात नागपूर महापालिकेच्या एका शिष्टमंडळाने जर्मनीतील कार्ल्सरु शहराला भेट दिली. या भेटीत हा करार करण्यात आला. या शिष्टमंडळात महापालिकेतर्फे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन लि.च्या संचालक मंडळातील नामनिर्देशित सदस्य तसेच बसपा गटनेते मोहम्मद जमाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, महाव्यवस्थापक राजेश दुफारे सहभागी झाले होते.

शिष्टमंडळाने कार्ल्सरु शहराचा दौरा केला. यावेळी शिष्टमंडळाने कार्ल्सरु शहरातील विविध कामांची पाहणी केली तसेच स्मार्ट सिटीवरील परिषदांमध्ये सहभाग घेतला. महाव्यवस्थापक राजेश दुफारे यांनी नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केले. कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी स्मार्ट सिटीसंदर्भात सादरीकरण केले.

नागपूर आणि कार्ल्सरु यांच्यातील करार हा संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाकांक्षी व प्रभावी ठरणार आहे. नागरी प्रश्नांवर दोन शहरांमध्ये चर्चा होईल. त्यामुळे जागतिक स्तरावर सहकार्याची भावना विकसित होईल, असा विश्वास कार्ल्सरु शहराचे इनोव्हेशन युनियनचे प्रमुख आर. इचहॉन यांनी व्यक्त केला. कार्ल्सरु शहरातील विकास कामांच्या गतिशिलतेने आपल्याला प्रभावित केले असून या करारामुळे इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन इंडिया प्रकल्पांतर्गत दोन शहरांमध्ये तंत्रज्ञानाची आदान-प्रदान होईल, असा विश्वास करारादरम्यान उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा : Tata Technologies & VDIA to launch aerospace & defence centre in Nagpur

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...

President Of India Inaugurates National Arogya Fair 2026 At Shegaon

Ayush Systems Of Medicine Have Made An Invaluable Contribution...