देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोरोना लस देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी एका तरुणीला लस देण्याचं आमिष दाखवत एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
तरुणीने बलात्काराला विरोध केला असता आरोपींनी तिचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात रुमालही कोंबला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी याचा अधिक तपास केला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील जमुनापूर परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. एका तरुणीला आरोपीला कोविड लस देण्याचं आमिष दाखवून जमुनापूर भागातील एका निर्जन घरात नेण्यात आलं. याठिकाणी दोघांनी पीडित तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.
पीडित तरुणीने याला विरोध केला. तेव्हा आरोपींनी हात-पाय घट्ट बांधले. तिच्या तोंडात रुमालही कोंबला. यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पीडितेने तरुणी आपली सुटका केली आणि घरी पोहचली आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. नातेवाईकांनी जमुनापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.