नागपुर : त्यांनी कधी शहर, गाडी, रेलवे, विमान बघितले नाही, काय या जगत असेही व्यक्ति आहेत ? त्यांचा सबंध फ़क्त जंगलाशी.. शहर त्यांचा करीता नवखेच. आशा गडचिरोली जिल्ह्यातील कुमारगुडयाच्या दुर्गम आदिवासी क्षेत्रातील लोकांनी उपराजधानी येऊन शहरी जीवनाची जाणीव केली.
शहरातील ऊंच इमारती, मोठाले रस्ते, सर्वत्र वाहनांची गर्दी, इथले स्टाइलिश लोक आणि मेट्रो रेलवे चे काम आदि पाहुन ते चक्क हरखले.
हे ३८ स्त्री आणि पुरुष आदिवासी लोकबिरादरी प्रकल्पाचा वतीने पहिल्यांदा शहरात आले होते. प्रकल्पाने आयोजित केलेल्या या शहर भेटीत १५ वर्षाच्या मुलीपासून ते पन्नाशीच्या प्रौधापर्यन्त लोकांचा समावेश होता. या भेटी दरम्यान त्यांनी दीक्षाभूमि, नागपुर रेलवे स्टेशन, मध्यवर्ती संग्रहालय, रिजर्व बैंक, आदि ऐतिहासिक इमारती बघितल्या. या आदिवासी लोकांनी त्यांचा सम्पूर्ण आयुष्यात कधीही शहर बघितले नाही.
अधिक वाचा : शहर का भव्य सुरेश भट सभागृह चलाया जा रहा है नुकसान में : आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या