प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजना सुरु केली. परंतु देशातील पाच राज्यांनी या योजनेला लागू न करण्याचा निर्णय घेत विरोध केला आहे. दिल्ली, ओडिशा, पंजाब, केरळ आणि तेलंगणा हे ते पाच राज्य आहेत. या राज्यांनी सांगितले की, जोपर्यंत त्यांना यापेक्षा चांगली योजना मिळत नाही तोपर्यंत ते या योजनेमध्ये सहभागी होणार नाहीत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर याला योजनेला ‘पांढरा हात्ती’ म्हणून संबोधले आहे. जेव्हा ओडिशा सरकाने या योजनेला स्वीकारण्यात असहमती दर्शवली तेव्हा पंतप्रधान नरेंद्रा मोदी यांनी नवीन पटनायक सरकारवर टीका केली. मोदी म्हणाले, ‘प्रत्येकजण आयुष्मान भारत योजनेचे महत्व जाणतो आहे. परंतु, नवीन बाबू यांना हे समजत नसावे. मुख्यमंत्री नवीन पटनायक या योजनेपासून दूर राहू ओडिशाच्या जनतेला यास्वास्थ विमा योजनेच्या लाभाबापासून वंचित ठेवत आहेत.’
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांच्या आयुष्मान भारत योजनेला पुढील निवडुका डोळ्यांसमोर ठेऊन प्रचार कार्यासाठी तयार केलेली योजना म्हणून संबोधले आहे. त्यांच्याबरोबर ते म्हणाले की हे देखील फक्त एक ‘‘जुमला’’ असणार आहे. ते पुढे म्हणाले दिल्ली येथील ५० लाखकटुंबापैकी फक्त सहा लाख कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
अधिक वाचा : पंतप्रधान आयुष्यमान भारत – पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे गडकरींच्या हस्ते नागपूरात लोकार्पण