IPL: आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा पहिलाच सामना दोन जबरदस्त संघांमध्ये

IPL: आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा पहिलाच सामना दोन जबरदस्त संघांमध्ये

MI vs RCB, IPL 2021, Match Preview: कोरोनाचं सावट असलं तरी क्रिकेट चाहत्यांच्या मनोरंजनासाठी IPLचं १४ वं सीझन उद्यापासून सुरू होतंय. IPLच्या यंदाच्या मोसमाचा पहिलाच सामना दोन जबरदस्त संघांमध्ये होतोय. एका बाजूला आहे आयपीएलच्या जेतेपदावर सर्वाधिक वेळा अधिराज्य गाजवलेला मुंबई इंडियन्सचा संघ तर दुसरीकडे मातब्बर आणि धडाकेबाज खेळाडूंचा भरणा असलेला कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ

चेन्नईच्या एम.ए.चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसमोर पहिल्या सामन्यासाठी काही अडचणी देखील आहेत. बंगळुरुच्या संघात देवदत्त पडीक्कल आणि डॅनियल सॅम यांना कोरोनाची लागण झाली. यात देवदत्त पुन्हा मैदानात परतला आहे. तर डॅनियल सॅम अद्याप क्वारंटाइन आहे. अॅडम झम्पा देखील पहिल्या सामन्यात खेळणार नाहीय.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघात क्वारंटाइनच्या नियमांमुळे दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेला क्विंटन डी कॉक पहिला सामना खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. पण मुंबईचा संघ एक खेळाडू संघात नसला तरी त्यांच्याकडे पर्यायी खेळाडू तयार आहेत. त्यात स्पर्धेचं पाचवेळा जेतेपद पटकावणारा संघ असल्याचं विसरुन चालणार नाही. त्यामुळे आकडेवारी पाहता मुंबईचं पारडं पहिल्या सामन्यात जड वाटत आहे.

Match: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)
Venue: एम.ए.चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
Time: उद्या रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी
Where to watch live: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, हॉटस्टार