नवी दिल्ली : करोना व्हायरसने मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला दिवाळीच्या सणासुदीत चालना देण्यासाठी आज केंद्र सरकारकडून डझनभर घोषणा करण्यात आल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्मनिर्भर भारत ३.० मधील योजनांची माहिती दिली.
अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा झाली आहे. बाजारातील वस्तूंची मागणी वाढली असून अर्थचक्र गतिमान होत असल्याने सीतारामन यांनी सांगितले. सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना अंतर्गत रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’ची घोषणा करण्यात आली आहे. संघटीत क्षेत्रातील रोजगाराला बळ मिळण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. त्याशिवाय उद्योगांना दिला जाणाऱ्या तातडीच्या पत पुरवठाविषयक योजनेला (Emergency Credit Line Guarantee Scheme) ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सरकारची दिवाळी भेट ; बँक कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, देशातील १० प्रमुख क्षेत्रांसाठी उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (PLI) योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारताच्या उत्पादन क्षमता आणि निर्यात क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणाला होणार फायदा?
१ ऑक्टोबरनंतर ज्यांना पुन्हा रोजगार मिळाला आहे आणि जे ईपीएफओमध्ये नोंदणीकृत आहेत, त्यांना याचा लाभ मिळेल.आत्मनिभार भारत अभियानाची कामगिरी चांगली झाली आहे. २ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रेशन कार्ड पोर्टेबिलिटीच्या अंतर्गत आहेत. ६८.६ कोटी लोकांना याचा फायदा झाला. पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत १३७३.३३ कोटी रुपयांचे १३.७८ कर्ज वाटप करण्यात आल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.
मे २०२० मध्ये सरकारने स्टिम्युलस पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे लक्ष तरलता वाढविणे आणि छोट्या व्यवसायांना सहज कर्ज उपलब्ध करून देणे असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. या पॅकेज अंतर्गत कोरोनामुळे प्रभावित झालेले टुरिझ्म, हॉस्पिटीलीटी आणि एविेशन सारख्या सेक्टर्सना सूट मिळाली आहे.