नागपूर : नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Date:

नागपूर – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या क्रूरकर्मा बापाला वाडी पोलिसांनी अटक केली आहे. धाकदपटशाहीसोबतच बेदम मारहाण करीत हा नराधम गेल्या दोन वर्षांपासून बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत होता. शेजाऱ्यांच्या दक्षतेमुळे ही घटना उघडकीस आली.

पीडित मुलगी 14 वर्षे वयोगटातील असून, दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. 12 वर्षीय लहान भाऊ आणि बापासह ती वाडी हद्दीत वास्तव्यास आहे. आरोपी बाप गवंडी असून त्याला मद्यपानाची सवय आहे. त्याची तीन लग्ने झाली असल्याचे कुटुंबीय सांगतात. पीडित मुलीची आई अनेक वर्षांपूर्वीच घर सोडून गेली. तेव्हापासून आरोपी हा मुलांचा सांभाळ करतो. पीडिता बारा वर्षांची असताना 2016 मध्ये आरोपी दारूच्या नशेत घरी आला आणि पोटच्या मुलीवरच तुटून पडला. मुलीने विरोध केला असता तिला मारझोड केली.

भीतीपोटी तिने बापाचा अत्याचार सहन केला. या घटनेनंतर हा नराधम सातत्याने मुलीवर अत्याचार करीत राहिला. तिने विरोध करताच कंबरेचा चामडी पट्टा आणि हाथबुक्कीने बेदम मारहाण करायचा. जिवे मारण्याची धमकी द्यायचा. बदनामी आणि भीतीपोटी ती गप्प राहून अत्याचार सहन करीत होती. मैत्रिणींनासुद्धा तिने याबाबत सांगितले नाही. यामुळे बापाची विकृती वाढतच होती. गुरुवारी रात्री आरोपी दारूच्या नशेतच घरी आला. डोक्‍यात सैतान संचारल्याप्रमाणे त्याने पुन्हा मुलीला ओरबाडण्याचा प्रयत्न केला.

परंतु, या वेळी मुलीने त्याला नेहमीपेक्षा जास्त विरोध केला. यामुळे चिडून आरोपीने मुलीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. परिणामी तिची सहनशिलता संपली आणि ती मदतीसाठी ओरडू लागली. शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला सोडविले. चौकशीत तिने आपबिती सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. तपास सुरू आहे.

अधिक वाचा : नागपूर : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related