नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने संविधान चौकात उभारण्यात येणार असलेल्या संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी (ता.६) भूमिपूजन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या.
याप्रसंगी आमदार प्रा. अनिल सोले, पश्चीम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती तथा कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक अमर बागडे, किशोर जिचकार, जितेंद्र घोडेस्वार, राजेंद्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे, सहायक आयुक्त अशोक पाटील, महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे सचिव शिवदास वासे, धर्मेश फुसाटे, संविधान फाउंडेशनचे प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, बबली मेश्राम, प्रा.पवन गजभिये, दीपक निरंजन, योगेश लांजेवार, प्रा. चंदू बागडे, रमेश वानखेडे, विशाल वानखेडे उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलींद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यासह सर्व मान्यवरांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रस्तावित संविधान उद्देशिका शिलालेखाचे भूमिपूजन केले.
देशाच्या हृदयस्थळी असलेल्या नागपूरात संविधान चौकात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र मध्यभागी असलेल्या संविधान चौकामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे शिलालेख असावे यासाठी नागपूर महानगरपालिकेसह महाराष्ट्र ऑफिसर फोरम व संविधान फाउंडेशनद्वारा वारंवार मागणी करण्यात येत होती. ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव यांनी यासंबंधी वेळोवेळी पाठपुरावा केला व नागपूर महानगरपालिकेने मागणी मंजुर करीत सदर संविधान उद्देशिका शिलालेखासाठी २३ लाख रुपये निधी मंजुर केला.
प्रास्ताविकात ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव यांनी संविधान उद्देशिका शिलालेखाची माहिती दिली. २३ लाख रुपयांच्या निधीमधून साकारण्यात येणा-या संविधान उद्देशिका शिलालेखाची उंची सुमारे १८ ते २० फुट राहणार असून या स्मारकाचे बांधकाम पिवळ्या व लाल सॅन्डस्टोनने करण्यात येईल. यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पॉलीमार्बल दगडावर कोरलेली असेल. या स्मारकाची प्रतिकृती संसद भवनाप्रमाणे राहील. संविधाच्या प्रतिकृतीवर राजमुद्रा असलेले अशोक स्तंभ असणार आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या शिलालेखामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव यांनी तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले तर आभार सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येत बौद्ध अनुयायी उपस्थित होते.
अधिक वाचा : मध्य नागपूरातील डी.पी.रस्त्याचे भूमीपूजन व एस.आर.ए. अंतर्गत मालकी हक्कांचे वाटप संपन्न