‘जनसंवाद’मधील प्रत्येक तक्रारीवर न्यायदान होईल : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Date:

नागपूर : रस्ता, वीज आणि पाणी हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यात कुठलीही आडकाठी येता कामा नये. या गरजांशी संबंधित तक्रारींचा तातडीने निपटारा करा. ज्या तक्रारी नियमानुसार आहेत, त्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या विहीत मुदतीत सोडविण्यात याव्या. ज्यासाठी निधीची आवश्यकता आहे, त्यासंदर्भात आपण स्वत: तातडीने निर्णय घेऊ. सर्व तक्रारींचा पाठपुरावा दर आठ दिवसांनी आपण करणार आहोत. प्रत्येक तक्रारींना न्याय मिळेल असा दिलासा नागरिकांना दिला तर तक्रारी सोडविण्यात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

नागपूर शहरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका झोननिहाय जनसंवाद कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याच नियोजनांतर्गत सोमवारी (ता. ३) मंगळवारी झोनमध्ये ‘जनसंवाद’ केला. यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेवक व नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, नगरसेवक संजय बुर्रेवार, किशोर जिचकार, महेंद्र धनविजय, नरेंद्र वालदे, प्रमिला मंथरानी, सहायक आयुक्त हरिश राऊत उपस्थित होते.

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी जनसंवाद कार्यक्रमात २६९ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली. या सर्व तक्रारींसंदर्भातील सद्यस्थिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ऐकून घेतली. ज्या तक्रारींची सोडवणूक झाली त्यावर तक्रारकर्ता समाधानी आहे काय, जर सोडवणूक झाली नसेल तर त्याची सोडवणूक किती दिवसांत होणार, याबाबत अधिकाऱ्यांकडून अवधी जाणून घेतला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या अवधीत तक्रारींची सोडवणूक नाही झाली तर थेट माझ्याकडे या, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

काही तक्रारी आणि अर्ज ह्या परिसरातील कामांच्या होत्या. त्या कामांना निधीची आवश्यकता असते. अशा अर्जांसंदर्भात त्या कामाचा प्रस्तावित खर्च पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विहीत मुदतीत मागितला. यामध्ये विशेषत्वाने मंगळवारी झोन कार्यालयानजिक सुलभ शौचालय, मंगळवारी येथील उद्यानाचे नूतनीकरण, पाईपलाईनचे नूतनीकरण या व अन्य काही कामांचा समावेश होता. यासाठी लागणाऱ्या निधीची व्यवस्था आपण स्वत: लक्ष घालून करु, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना दिले.

ज्या नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक झाली आहे, त्यांना पत्र द्या. ज्यांच्या अर्जावर कार्यवाही सुरू आहे, ते कार्य किती दिवसांत पूर्ण होणार, याची माहिती संबंधित अर्जकर्त्यांना द्या. जे काम नियमानुसार आहे, ते तातडीने पूर्ण करा. झोन सभापती आणि झोन सहायक आयुक्त स्वत: या तक्रारींचा पाठपुरावा करतील. आपण दर आठ दिवसांनी या अर्जांची स्थिती जाणून घेऊ. पुढील १५ दिवसानंतर झोन कार्यालयात आपण स्वत: बैठक घेणार आहोत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठलाही हलगर्जीपणा न करता तातडीने कार्य पूर्ण करावे. जनसंवादात आलेल्या प्रत्येक तक्रारींचे निरसन व्हायलाच हवे, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. यावेळी नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर भूमापन कार्यालय, ओसीडब्ल्यू, स्पॅनको यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मालकी हक्काचे पट्टे मिळण्यातील अडचण दूर

जनसंवाद कार्यक्रमात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासंदर्भातील काही अर्ज होते. त्यावर बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की शासनाने १७ नोव्हेंबर २०१८ रोजी काढलेल्या आदेशानुसार यातील अडचण पूर्णपणे दूर झाली आहे. त्यामुळे नियम व अटीनुसार जे मालकी पट्ट्याचे हकदार आहेत, त्यांना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मिळतील, असे ते म्हणाले. बेघरांना पंतप्रधान आवास योजनेतून हक्काचे घर मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : जागतिक दिव्‍यांग दिन : फुटाळा परिसरात स्वच्छता अभियान

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

SMHRC Opens Doors to Specialized Outborn Neonatal Care for Newborns in Need

SMHRC Launches Dedicated Outborn NICU Offering 24/7 Specialized Care...

New Announcement by Meta: Changing WhatsApp Business Pricing

Meta has officially announced significant updates to WhatsApp Business...

Pioneering Global Excellence: DMIHER’S Maiden Performance in Times Higher Education (THE) World University Rankings 2025

"DMIHER Achieves Global Milestone: Debut Performance in Times Higher...