नागपुर :- देशात रोज इंधनदरवाढ होत आहे त्यामुळे ही देशातील मोठी समस्या आहे. या समस्या वर सरकार पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळात यासाठी केंद्र सरकार इथेनॉल प्रकल्प उभारणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली. मागील काही दिवसात पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे, लोकांमध्ये रोष निर्माण होत आहे. याला उपाय शोधण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
देशात ७० टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात होतात. निर्यात करणारे देश उत्पादन कमी करुन पेट्रोलियम पदार्थांची किंमत वाढवतात. यामुळे आपल्याला इंधनाच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकार देशात इथेनॉलचा प्रकल्प उभारणार आहे असे त्यांनी सांगितले.
ऊसापासून तयार होणाऱ्या मालायसेसपासून २२ टक्के, बी मालायसेसपासून ६ टक्के इथेनॉल बनते असे गडकरी म्हणाले. या प्रकल्पामुळे ५० लाख रोजगार तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षा, दुचाकींचा वापर नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल.
तसेच, या इंधनाच्या वापरामुळे पेट्रोलच्या किंमती ८ ते १० रुपयांनी कमी करता येतील असे गडकरी म्हणाले. इथेनॉलसोबतच सांडपाण्यातून मिथेन काढुन त्याचा वापरही इंधन म्हणून करण्यात येणार आहे. याची सुरुवात गंगा शुद्धीकरणापासून होईल अशी त्यांनी माहिती दिली.
अधिक वाचा : सेतु भाषा के तौर पर हो हिंदी का विकास, क्षेत्रीय भाषाओं का भी करें जतन – पुलिस आयुक्त उपाध्याय