EPFO : ईपीएफओने आपल्या खातेदारांच्या नियमात काही बदल केले आहेत. आपण नोकरीस असाल तर हा बदल काळजीपूर्वक समजून घ्या.
मुंबई : EPFO New Rule: Employees’ Provident Fund Organisation (EPFO) : ईपीएफओने आपल्या खातेदारांच्या नियमात काही बदल केले आहेत. आपण नोकरीस असाल तर हा बदल काळजीपूर्वक समजून घ्या. मग तो नवीन नियम काय आहे आणि तो आपल्या ईपीएफ योगदानावर कसा परिणाम करेल हे समजून घ्या. हे नियम उद्यापासून म्हणजेच 1 जूनपासून लागू होतील. म्हणजेच आपल्याकडे आजची फक्त एक दिवसाची संधी हातात आहे.
पीएफ खाते – आधारशी लिंक करा
नवीन ईपीएफओ (EPFO) नियमानुसार प्रत्येक खातेधारकाचे पीएफ खाते आधार (Aadhaar) कार्डाशी जोडलेले असावे. याची जबाबदारी ही कर्मचार्याची आहे. त्यांना त्यांचा पीएफ खाते आधारला जोडण्यास सांगण्याची जबाबदारी कंपनीची असेल. 1 जूनपर्यंत, जर एखादा कर्मचारी असे करण्यास अयशस्वी झाला तर त्याच्या पीएफ खात्यात त्याची कंपनी किंवा मालक पीएफ योगदान देखील थांबवले जाऊ शकते. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. ईपीएफओने या संदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे.
नवीन नियम म्हणजे काय?
ईपीएफओने सामाजिक सुरक्षा कोड 2020 च्या कलम 142 अंतर्गत नवीन नियम लागू केले आहेत. ज्यामध्ये ईपीएफओने नियोक्तांना स्पष्ट केले आहे की 1 जूनपासून पीएफ खाते आधारशी जोडले गेले नाही किंवा यूएएन आधार पडताळले नाही तर त्याचे ईसीआर-इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरले जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा की पीएफ खातेधारकांना मालकाचा हिस्सा मिळू शकणार नाही. केवळ आपले योगदान खात्यातील कर्मचार्यांना दिसेल.
ईपीएफ खात्यास आधारशी कसे जोडावे
जर आपण अद्याप आपल्या पीएफ खात्याचा आधार जोडलेला नसेल तर ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि प्रथम आपले खाते आधार कार्डाशी लिंक करा आणि आधार सत्यापित यूएएन देखील मिळवा. नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात पीएफ योगदानाशिवाय कंपनीची रक्कम जोडली जात होती. मात्र, आधार लिंक नसेल तर ही रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे तात्काळ आधार लिंक करुन पीएफ खाते जोडा.
1. सर्व प्रथम, आपल्याला ईपीएफओ वेबसाइट www.epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल.
2. त्यानंतर ऑनलाईन सेवांवर जा आणि ई-केवायसी पोर्टलवर क्लिक करा आणि यानंतर यूएएन आधारशी लिंक करा.
3. आपणास आपला यूएएन नंबर व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यूएएन खात्यातून अपलोड करावा लागेल.
4. आपल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी नंबर येईल.
5. आपला 12 अंकी आधार नंबर आधार बॉक्समध्ये भरा आणि सबमिट करा
6. नंतर पुढे जाण्यासाठी ओटीपी पडताणीसाठी येईल, त्यावर क्लिक करा
7.. पुन्हा आधार तपशिलाची पडताळणी करण्यासाठी ओटीपी आधार लिंक मोबाइल फोनवर किंवा मेलवर तयार करावा लागेल.
8. पडताळणीनंतर तुमचा आधार तुमच्या पीएफ खात्याशी लिंक होईल.