मिहानमध्ये ५४ हजार युवकांना रोजगार- नितीन गडकरी

Date:

नागपूर :देशाचे विकासपुरुष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या काळात दिलेले आश्वासन पूर्ण केले असून विदर्भाचे चित्र बदलविणाèया मिहान प्रकल्पातील विविध कंपन्यांमध्ये नागपूरसह विदर्भातील ५४ हजार हून अधिक म्हणजे ५४ हजार ८६८ युवकांना मिळाल्याची माहिती नितीन गडकरी यांनी आज जारी केली असून त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त युवकांचा थेट अंतर्भाव असल्याचे दिसते.
मिहानमधील सेझ मध्ये १६ हजार ९१५ युवकांना प्रत्यक्ष तर १९४९२ युवकांना अप्रत्यक्ष असे एक़ूण ३६ हजार ४०७ युवकांना नोकरीची संधी मिळाली. विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) बाहेरील मिहान प्रकल्पात ४ हजार २०२ युवकांना प्रत्यक्ष तर ११ हजार ९६० युवकांना अप्रत्यक्ष असे एक़ूण १६ हजार १६२ युवकांना रोजगार मिळाला. यासोबतच मिहानचे मुख्य आकर्षक असलेल्या सेंट्रल फॅसिलिटी बिल्डींगमध्ये २२९९ असे एक़ूण ५४ हजार ८६८ युवकांना काम मिळाले आहे.
यातही विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) मधील एअर इंडिया एमआरओमध्ये ३ हजार प्रत्यक्ष आणि १५०० अप्रत्यक्ष, सेनोस्पियरमध्ये अनुक्रमे २५ आणि ५०, डाएट फूडसमध्ये २० व ५०, एनएसएसमध्ये थेट ५०, हास कार्पोरेशमध्ये १० व १५०, एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये २ हजार व ५००, एचसीएल न्यु मध्ये ४४० व ५००, हेक्सावेअरमध्ये १५०० व ५ हजार, इन्फोसिसमध्ये ३५० व ५००, अ‍ॅस्पिनमध्ये ५०, कोलॅण्ड डेव्हलपर्समध्ये ४०० व ४००, कृष्णा इन्फोटेकमध्ये १५०, लाईटहाऊसमध्ये १००, ल्युपिन फार्मामध्ये १८०० व ५००, मेटाटेकमध्ये १० व २०,
प्रवेश एक्सपोर्टमध्ये १००, रिलायन्स एअरोस्ट्रक्चरमध्ये २५ व २००, स्मार्ट डाटामध्ये ४०० आणि १ हजार, ताल मॅन्युफॅक्चरींगमध्ये ३५० व ५ हजार, टीसीएसमध्ये ७ हजार आणि ५००, टीसीएस न्यु मध्ये ५०० आणि २००, टेक मqहद्रा मध्ये ३५० आणि ६००, रिलायन्स डीआरएलमध्ये १०० व २३०, रिलायन्स थेलेस ५० व ४०, टीआरटी टेक्नॉलॉजीमध्ये २५, जीआयएफमध्ये ३० व ५० युवकांना रोजगार प्राप्त झाला.
यासोबतच मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील कंपन्यांमध्ये एम्समध्ये प्रत्यक्ष ५०० व अप्रत्यक्ष ५००, भारत पेट्रोलियममध्ये १० व ५०, दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये ५० व ५०, कंटेनर कार्पोरेशनमध्ये ५५० आणि १५००, डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये २५ आणि ६०, फ्युचर सप्लाय चेन (बिग बाजार)मध्ये २५०० आणि ६ हजार, गती कार्गोमध्ये २००, महिंद्रा लाईफस्पेसमध्ये १ हजार, मोराज इन्फ्राटेकमध्ये २० आणि ५६०, प्लेनम टेकमध्ये ३० व ४५०, रेटॉक्स बिल्डर्समध्ये २५ व २००, टीसीआय एन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ३०० व ५००, न्युबेनो हेल्थकेअरमध्ये ३०० तसेच नव्याने उभारलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ७० व ५० तर भारतीय विद्या भवन शाळेत ५० लोकांना प्रत्यक्ष तर ३०० लोकांना अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला.
मिहानमधील सेंट्रल फॅसिलिटी बिल्डींगमधील आल्टीस कस्टमर कंपनीत २००, एडीसीसी इन्फोकॉममध्ये २५, बायलॉजिक्स एक्सपर्टमध्ये १५, कॅनरा बँकमध्ये ६, सायटस बीपीओमध्ये १५०, इबिक्स सॉफ्टवेअरमध्ये २५०, ग्लोबललॉजिकमध्ये ७००, इन्फोसेफ्टमध्ये ५००, एमएडीसी कार्यालयात ४७, एस्कॉन रिसर्चमध्ये ४५ तसेच मॅक्सिमिस्टमध्ये ५० युवकांना थेट रोजगार प्राप्त झाला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...